शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त मोजणीसाठी निधीचे प्रस्ताव पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेल्या गावांचे संयुक्त मोजणी करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव रेल्वे विभागाने तत्काळ वरिष्ठांकडे ...

उस्मानाबाद : उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेल्या गावांचे संयुक्त मोजणी करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव रेल्वे विभागाने तत्काळ वरिष्ठांकडे सादर करावा, अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या.

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइन मार्गासंदर्भात रेल्वे विभागाचे अधिकारी, महसूल विभाग व उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची दर महिन्याला आढावा बैठक घेतली जातेे. सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी खा.राजेनिंबाळकर यांनी हे निर्देश दिले. प्रारंभी मागील बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने चर्चा झाली. हा रेल्वे मार्ग उस्मानाबाद तालुक्यातील ९, तुळजापूर तालुक्यातील १५ तर सोलापूर तालुक्यातील ९ गावांतून जातो. या सर्व रेल्वे मार्गात येणाऱ्या गावांचे सर्वेक्षण व मोजणीचे गावनिहाय प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना मागील महिन्याच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने रेल्वे विभागाने महसूल विभागाकडे ३० गावांचे प्रत्यक्ष संयुक्त मोजणीसाठीचे प्रस्ताव दाखल केले असून, केवळ तीन गावांचे प्रस्ताव बाकी आहेत, ते १० सप्टेंबरपर्यंत दाखल करावे, असे निर्देश खा.राजेनिंबाळकर यांनी यावेळी दिले.

पहिल्या टप्प्यात सरकारी संयुक्त मोजणी करावी व दुसऱ्या टप्प्यात खासगी मोजणी करण्यास सांगितले. उर्वरित तीन गावांचे सुधारित सीमांकन रेल्वे विभागाने तीस दिवसांत पूर्ण करून, या गावांचेही मोजणीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीस आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवळे, भूसंपादनचे समन्वयक राजकुमार माने, सोलापूरच्या समन्वयक गायकवाड, लोंढे, मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे सहायक अभियंता राजनारायण, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक अशोक माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.