महसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:51 PM2018-09-21T15:51:55+5:302018-09-21T15:53:07+5:30

महसूलच्या पथकाने कारवाई करून पोलीस पाटलाच्या ताब्यात दिलेले दोन ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केले.

seized Two tractors by Revenue operation was stolen | महसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस

महसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस

googlenewsNext

उस्मानाबाद : महसूलच्या पथकाने कारवाई करून पोलीस पाटलाच्या ताब्यात दिलेले दोन ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री वाशी तालुक्यातील जेबा शिवारातील नदीपात्रात घडली़ या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वाशी तालुक्यातील जेबा शिवारातील मांजरा नदीपात्रात बुधवारी दुपारी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर फसला होता़ घटनेची माहिती मिळताच वाशी येथील नायब तहसीलदार भालचंद्र यादव, तलाठी पाचकुडवे यांनी मांजरा नदीपात्रातील या ट्रॅक्टरचा पंचनामा केला. एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह व एक ट्रॅक्टर हेड जप्त करून जेबाचे पोलीस पाटील रमाकांत रावसाहेब लहाने यांच्या ताब्यात दिले होते.

 ट्रॅक्टर (क्ऱएम़एच़२४-एल़५८२३), हा नदीतील चिखलात अडकला होता़ त्यामुळे बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलीस पाटील लहाने तेथून निघून गेले़ दुसऱ्या दिवशी गुरूवारी पहाटे ते घटनास्थळी गेल्यानंतर एक ट्रॅक्टर हेड, दुसरे ट्रॅक्टर व त्याच्या ट्रॉलीची चोरी झाल्याचे दिसून आले़ या प्रकरणी जेबा गावचे पोलीस पाटील रमाकांत लहाने यांनी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास एस़ए़ढाकणे हे करीत आहेत़

Web Title: seized Two tractors by Revenue operation was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.