शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखाचा गुटखा चौकीतच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 00:26 IST

येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा प्रशासनाला पत्र दिल\

येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा रविवारी रात्री उशिरापर्यंतही येणेगूर दूरक्षेत्राच्या इमारतीत पडून होता़ मुरूम पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले असून, सुटीमुळे संबंधित विभागाचे अधिकारी येवू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले़येणेगूर येथील बसस्थानकाच्या पाठीमागील भागात शनिवारी सकाळी १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा बेवारस गुटखा आढळून आला होता़ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येणेगूर चौकजवळील महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती़ त्यामुळे हा गुटखा कोणीतरी वाहनातून नेताना पोलिसांच्या भितीने फेकून दिला असल्याचा कायास पोलिसांनी बांधला आहे़ येणेगूर दूरक्षेत्राचे पोहेकॉ विजय साखरे, पोना बिभिषण बोकळे, दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील गुटख्याचे बॉक्स येणेगूर दूरक्षेत्राच्या इमारतीत नेवून ठेवले आहेत़ गुटखा आढळल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ दरम्यान, गुटखा सापडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली होती़ मात्र, रात्री उशिरापर्यंतही अधिकारी आले नव्हते़ विशेष म्हणजे पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही जावू, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते़ दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने हे अधिकारी येणेगुरात आलेले नव्हते़ तर मुरूम पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला गुटख्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी तरी हा गुटखा उचलला जाणार की नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे़ (वार्ताहर)