शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोबी पिकात फिरविला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

वाहतूक खर्चही निघेना : कोरोना संकटामुळे मागणी अन्‌ भावातही झाली घसरण तुळजापूर : दोन एकरावर कोबीची लागवड केली. मशागत, ...

वाहतूक खर्चही निघेना : कोरोना संकटामुळे मागणी अन्‌ भावातही झाली घसरण

तुळजापूर : दोन एकरावर कोबीची लागवड केली. मशागत, लागवड, औषधे फवारणी आदींवर मोठ्या खर्च करून चांगले उत्पादन हाती पडेल, अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे संकट उभारले. यामुळे बाजारात मागणी घटली असून, दरही कमालीचे उतरले आहेत. यातून वाहतूक खर्चही पदरी पडत नसल्यामुळे तालुक्यातील आरळी (बु.) येथील शेतकरी प्रभाकर उकरंडे यांनी पिकात रोटावेटर फिरविण्याचा निर्णय घेतला.

पारंपरिक शेतीला पर्यायी शेती म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अन्‌ तरुण आज फुलांची शेती, भाजीपाला व फळभाज्यांची लागवड करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. परंतु, नैसर्गिक आपत्ती बरोबरच कृत्रिम समस्याही वारंवार त्यांचा पाठलाग करीत आहेत. कोरोनाच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन्‌ वार्षिक खर्चाचा मेळ घालण्यासाठी प्रयोगशील शेती करण्याची धडपड सुरू असतानाच अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.

तालुक्यातील आरळी (बु) येथील शेतकरी प्रभाकर उकरंडे यांनीही दोन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली होती. याची जोपासणा करण्यासाठी त्यांनी जवळपास चाळीस हजार रुपये खर्च केला. परंतु, ऐन काढणीच्या हंगामात कोरोनाचे संकट उभे ठाकले.

गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारने लग्न समारंभ व हॉटेल व्यवसायावर बंदी घातली आहे. परिणामी कोबीची मागणी घटली असून, बाजारात देखील भाव पडले आहेत. कवडीमोल दराने कोबी विकावा लागत असून, यातून बाजार पेठेत ने-आण करण्यासाठीचे गाडी भाडे सुद्धा हाती पडेनासे झाले आहे. यामुळेच उकरंडे यांनी अखेर दोन एकरातील कोबी पिकात रोटावेटर फिरविला.

कोट......

दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकांची जोपासना करतो. परंतु, सरकारकडून त्याला हमीभाव मिळत नाही. बाजारभावात ही कायमस्वरूपी चढउतार असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. कोरोना लॉकडाऊन परिस्थिती असल्याने बाजारात कोबीला केवळ एक रुपया किलोचा दर मिळत आहे. वाहतुकीसाठी मात्र एका पोत्याला ४० रुपये मोजावे लागतात. याशिवाय, बारदाना व मजुरीवरही खर्च करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने वैतागून शेतातील कोबीवर रोटर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

- प्रभाकर उकरंडे, शेतकरी, आरळी (बु.)