रस्ते कामाच्या दर्जावरून रहिवासी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST2021-07-10T04:23:08+5:302021-07-10T04:23:08+5:30

उमरगा : शहरातील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये सुरू असलेले सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व गटारीचे काम नियमाप्रमाणे केले जात नाही. ...

Residents aggressive from the quality of road work | रस्ते कामाच्या दर्जावरून रहिवासी आक्रमक

रस्ते कामाच्या दर्जावरून रहिवासी आक्रमक

उमरगा : शहरातील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये सुरू असलेले सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व गटारीचे काम नियमाप्रमाणे केले जात नाही. त्यामुळे हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी करीत रहिवाशांनी थेट नगर परिषद गाठून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शहरातील विविध भागात रस्ते व गटारी बांधकामाची कामे माेठ्या प्रमाणात सुरू आहेत. वॉर्ड क्रमांक १८ मधील राष्ट्रीय महामार्ग ते बाबा औटी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व गटारीचे काम सुरू आहे. सदरील कामास २३ जून पासून प्रारंभ झाला आहे. चालू असलेल्या कामाचे कसलेच मोजमाप न करता काम करण्यात येत आहे. या कामी या वॉर्डातील रहिवासी नागरिकांना कसल्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. मंजूर अंदाजपत्रकानुसार काम केले जात नाही. त्यामुळे हे काम तातडीने थांबवावे. रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून मंजूर इस्टिमेटनुसार दर्जेदार काम करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. संबंधितांनी पालिका कार्यालय गाठून मुख्याधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनावर प्रवीण भोसले, सुधीर गाडे, मनोज लुल्ल, शिशुपाल हत्तरगे, श्रीशैल्य बोणे, मंगेश कुंभार, विजय डिग्गीकर, अनिल कुंभार, श्रीनिवास माने, सुमित अल्लापुरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Residents aggressive from the quality of road work