प्रभात मंचच्या वतीने सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:44+5:302021-07-02T04:22:44+5:30

उमरगा : विविध उपक्रमात अग्रभागी असलेल्या शहरातील प्रभात मंच ग्रुपच्या वतीने विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या उपअधीक्षक अभियंता, मुख्याध्यापक व ...

Reception ceremony on behalf of Prabhat Manch | प्रभात मंचच्या वतीने सत्कार सोहळा

प्रभात मंचच्या वतीने सत्कार सोहळा

उमरगा : विविध उपक्रमात अग्रभागी असलेल्या शहरातील प्रभात मंच ग्रुपच्या वतीने विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या उपअधीक्षक अभियंता, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यात पाटबंधारे विभागातील उपअधीक्षक अभियंता पदावरून निवृत्त झालेले मॉर्निंगवाॅकचे सदस्य शांताकुमार मोरे, शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ शैक्षणिक कार्य करीत सेवानिवृत्त झालेले विठ्ठल जाधव व शिक्षक ते पर्यवेक्षक पदापर्यंतची सेवा देऊन निवृत्त झालेले सिराज मुगळे यांचा कैलास शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर भोसले, मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यंकटराव नावडे, तुकाराम बिराजदार, राजेंद्र झांबरे, मारुती जाधव, लक्ष्मण चव्हाण, दयानंद उमाटे, राजेंद्र जाधव, गुंडू दुधभाते, अनिल केशवशेट्टी, संजय घोडके, सुदेश माने, राणाप्रताप जाधव, शमिम सास्तुरे, प्रभाकर मुरूमकर, ईश्वर मुगळे, अंबादास जाधव, बिभीषण बिराजदार, प्रशांत जाधव, सुमित मोरे, किशोरकुमार मोहिते यांच्यासह प्रभात मंच व मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Reception ceremony on behalf of Prabhat Manch