हिरव्यागार शिवारात रंगले पावसाळी कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:34+5:302021-07-20T04:22:34+5:30
येथील कवी व लेखक बालाजी इंगळे, कमलाकर भोसले, प्रकाश बोंडगे, श्रीहरी जाधव, राहुल सोनवणे यांनी यासाठी पुढाकार घेतला. या ...

हिरव्यागार शिवारात रंगले पावसाळी कविसंमेलन
येथील कवी व लेखक बालाजी इंगळे, कमलाकर भोसले, प्रकाश बोंडगे, श्रीहरी जाधव, राहुल सोनवणे यांनी यासाठी पुढाकार घेतला. या संमेलनात बालाजी इंगळे यांनी पावसाने ओढ दिल्यानंतर, पाऊस अति झाल्यानंतर शेतकऱ्यांची कशी परिस्थिती होते याचे वर्णन करणाऱ्या कविता सादर केल्या.
‘पाऊस’ या कवितेत ते म्हणाले
पाऊस जागवतो आशा
पाऊस नवजीवन देतो
शेतशिवारच नाही तर
जीवनही हिरवे करतो..’
पावसाळ्यात सृष्टी कशी बदलून जाते हे चित्र उभे करताना कवी कमलकार भोसले यांनी सकाळच्या पावसाचे वर्णन केले. ते म्हणाले,
‘सकाळच्या प्रहरात
दवबिंदू प्रकाशतात,
शेताच्या बांधावर
मोत्याने सजतात...’
कवी राहुल सोनवणे यांनी आपल्या कवितेतून उसाच्या शेतातील पावसाचे वर्णन केले. यावेळी प्रकाश बोंडगे, श्रीहरी जाधव यांनीही कविता सादर केल्या. शाहुराज जाधव, सुधाकर पवार, अतुल सोनवणे, सुधाकर शिंदे यांच्यासह मोजकेच रसिक व शेतकरी या आगळ्यावेगळ्या कवी संमेलनास उपस्थित होते.