उमरगा प्रशालेत वृक्षारोपण, पुस्तके वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:08+5:302021-07-08T04:22:08+5:30

उमरगा : प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना चालू घडामोडीचा अभ्यास व थोर महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होणे काळाची आहे, असे ...

Plantation at Umarga School, distribution of books | उमरगा प्रशालेत वृक्षारोपण, पुस्तके वाटप

उमरगा प्रशालेत वृक्षारोपण, पुस्तके वाटप

उमरगा : प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना चालू घडामोडीचा अभ्यास व थोर महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होणे काळाची आहे, असे विचार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे राचय्या स्वामी, इसाक शेख, तालुक्यातील दिव्यांग बांधव व शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Plantation at Umarga School, distribution of books