नळदुर्ग येथे शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST2021-07-10T04:23:14+5:302021-07-10T04:23:14+5:30
शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी सपोनि सुधीर मोटे, पोउपनि मुसा शहा, ...

नळदुर्ग येथे शांतता कमिटीची बैठक
शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी सपोनि सुधीर मोटे, पोउपनि मुसा शहा, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक लक्षण कुभार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
सपाेनि राऊत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे सतत मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, गर्दी करू नये, सतत हात धुवा याची सवय समाजात रुजवा व स्वतः पालन करावे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण, नगरसेवक शहबाज काझी, धर्मगुरू मौलाना महमंद रजा आलीमसाब यांच्यासह आदींनी मनाेगत व्यक्त केले. बैठकीस माजी नगराध्यक्ष मुशताक कुरेशी, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, मनसेचे ज्योतिबा येडगे, अलीम शेख, संदीप वैद्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबूब शेख, माजी उपनगराध्यक्ष शफी शेख, सरदारसिंग ठाकूर, खय्युम कुरेशी, खलील शेख, मुनिर शेख, रिजवान काझी, बशीर शेख, शहर काझी शोएब काझी, शब्बीर कुरेशी, अझर जहागीरदार, सतीश पिसे, विलास येडगे, शिवाजी नाईक, आयुब शेख, इरफान काझी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी वाघमारे, हवालदार अच्युत पोतदार आदींनी परिश्रम घेतले.