ऑक्सिजन ग्रुप व शिवसेनेच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:04+5:302021-07-03T04:21:04+5:30

कळंब : जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून कोरोनासारख्या महामारीच्या काळात ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला अशा ...

Oxygen Group and Shiv Sena celebrate Doctor's Day | ऑक्सिजन ग्रुप व शिवसेनेच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा

ऑक्सिजन ग्रुप व शिवसेनेच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा

कळंब : जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून कोरोनासारख्या महामारीच्या काळात ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला अशा डॉक्टरांचे आभार मानत ऑक्सिजन ग्रुप आणि तालुका शिवसेनेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे होते. यावेळी डॉ. जीवन वायदंडे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. शोभा वायदंडे, डॉ. सुजित आवटे, डॉ. शाम चौधरी, डॉ. बिदरकर, डॉ. भालेराव, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. शरद दशरथ, डॉ. मीरा दशरथ, डॉ. चव्हाण, डॉ. अभिजीत लोंढे, डॉ. गोरे, डॉ. भक्ती गीते, डॉ. उबाळे, डॉ. जगताप, डॉ. शेळके तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऑक्सिजन ग्रुपचे सदस्य सुशील तीर्थकर, अशोक काटे, चेतन कात्रे, आकिब पटेल, उदयचंद्र खंडागळे, इस्माईल हन्नुरे, सादिक पठाण, जावेद शेख, शंकर खंडागळे, रमेश अंबीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर शहरातील डॉ. रमेश जाधवर, डॉ. सचिन पवार, डॉ. रुपेश कवडे, डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. रमेश वाघ, डॉ. सुशीलकुमार ढेंगळे, डॉ. शिनगारे, डॉ. गोरे यांचाही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सन्मान केला.

Web Title: Oxygen Group and Shiv Sena celebrate Doctor's Day