दहावीतील गुणवंतांचा विद्याभवनमध्ये सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:24+5:302021-07-19T04:21:24+5:30

कळंब : येथील विद्याभवन हायस्कूलमधील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी शिवपूजा झोरी, राही ...

The meritorious students of class X were felicitated at Vidya Bhavana | दहावीतील गुणवंतांचा विद्याभवनमध्ये सत्कार

दहावीतील गुणवंतांचा विद्याभवनमध्ये सत्कार

कळंब : येथील विद्याभवन हायस्कूलमधील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थिनी शिवपूजा झोरी, राही कल्याणकर यांनी १०० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याशिवाय, स्नेहा लांडगे, धनश्री टेकाळे, निकिता कदम, (द्वितीय), स्वराली लोकरे, (तृतीय), तेजस्वी थोडसरे, सुप्रिया सावंत, हर्षवर्धन तीर्थकर, पार्थ बाविकर, ऋतुजा ठोंबरे, तनवी पिंगळे, तेजस मगर, सोनाली पानढवळे, चैताली गंभिरे, श्रावणी वरपे, श्रेयश साबळे, यश रणदिवे, आचल वाघचौरे, पूजा उमाप, आदिती यादव, तनिषा लांडगे, निकिता शेळके, राजवर्धन हुंबे, प्रांजली माने, योगेश गिरी, तुषार वाघमारे, नम्रता अडसूळ, अनुष्का मोरे, सुरज ढेंगळे या विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एस. पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका आर. बी. धाबेकर, माजी शिक्षण विस्ताराधिकारी कल्याणकर डॉ. रमाकांत कल्याणकर, एस. एस. बारकुल, दिलीप गंभीरे, सुशीलकुमार तीर्थकर उपस्थित होते. याप्रसंगी संजय जगताप, सागर विनोद, ज्योतीराम सोनके, निशांत जिंदमवार, अशोक राऊत, आर. आर. बचाटे, एस. एम. बावकर, आप्पासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते.

170721\0717img-20210717-wa0080.jpg

कळंब येथील विद्याभवन विद्यालयातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला

Web Title: The meritorious students of class X were felicitated at Vidya Bhavana