भारत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:23+5:302021-07-19T04:21:23+5:30

उमरगा : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश मिळविलेल्या येथील भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार ...

Meritorious felicitation at Bharat Vidyalaya | भारत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

भारत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

उमरगा : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश मिळविलेल्या येथील भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शाहूराज जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुभाषराव वाघमोडे उपस्थित होते. यावेळी वैष्णवी मुसांडे, सृष्टी क्षीरसागर, मुजावर साबेर खाजापशा, धनश्री नांगरे, संस्कार कांबळे, सोनाली काळे, माधुरी आगडे, ऋषिकेश खटके, भाग्‍यश्री मोरे, श्रेया माकणीकर, आस्था जोळदपके, लदाफ अफवान हुसेन हसन, शिवम काळे, पौर्णिमा कांबळे, मुस्कान रसूल शेख, साक्षी मोरे, ऐश्वर्या नेताजी पाटील, प्रगती कांबळे, सोहेल मुस्तफा शेख, आस्था लोमटे, सौरभसिंग राठोड, प्रतीक्षा पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक विक्रांत मोरे, संजय देशमुख, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांनी केले.

Web Title: Meritorious felicitation at Bharat Vidyalaya