शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘अरेरावी’वरून आता सदस्यही आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी वित्त विभागाकडे कुठलेही काम प्रलंबित नसताना दालनात येऊन अरेरावीची भाषा केल्याचे अध्यक्ष अस्मिता ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी वित्त विभागाकडे कुठलेही काम प्रलंबित नसताना दालनात येऊन अरेरावीची भाषा केल्याचे अध्यक्ष अस्मिता कांबळे, सीईओ राहुल गुप्ता यांची भेट घेऊन सांगितले हाेते. ही वार्ता लेखा व अन्य कर्मचारी संघटनांपर्यंत पाेहाेचताच त्यांनीही तातडीने सीईओ गुप्ता यांची भेट घेऊन गीते यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली हाेती. यानंतर १९ जुलै राेजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. कारवाई न झाल्यास कामबंद आंदाेलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, या सर्व घडामाेडी घडत असतानाच राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या काही सदस्यांनी एकत्र येत थेट सीईओ गुप्ता यांची शुक्रवारी भेट घेतली. गीते यांनी कुठल्याही स्वरूपाची चुकीची भाषा वापरलेली नाही. उलट केंद्रे यांनीच गीते यांना अवमानकारक वागणूक दिली. खाेटे व बिनबुडाचे आराेप केले. एवढेच नाही तर अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मनामध्ये गैरसमज पसरवून शासकीय कामकाज प्रभावित केले. त्यांनी केलेल्या चुकीच्या आराेपांमुळे जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी गीते यांची बदनामी झाली, अशा शब्दात पलटवार केला. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे, सक्षणा सलगर, संदीप मडके, नितीन शेरखाने, जगताप, खंडागळे, इम्रान पठाण, शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती हाेती. त्यामुळे हे प्रकरण आता नेमक्या काेणत्या वळणावर जावून ठेपते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.