जागजी, वडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:25+5:302021-07-16T04:23:25+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. असे असतानाच उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील एकजण झाेपेत ...

Jagji, a swarm of fours in Wadgaon | जागजी, वडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

जागजी, वडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. असे असतानाच उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील एकजण झाेपेत असताना त्याच्या उशाखाली ठेवलेले माेबाइल लंपास केले. तर जागजी शिवारातील साैरऊर्जा संचाचे साहित्य अज्ञाताने लांबविले. या प्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वडगाव सिद्धेश्वर येथील कुलभूषण प्रल्हादराव माने हे १४ जुलैच्या रात्री गावातीलच आपल्या घर बांधकामाच्या ठिकाणी झाेपले हाेते. झाेपताना त्यांनी आपले दाेन्ही माेबाइल उशाखाली ठेवले हाेते. दरम्यान, ते झाेपेत असतानाच अज्ञात चाेरट्यांनी माने यांचे दाेन्ही माेबाइल लंपास केले. चाेरीची ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर त्यांनी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत. दुसरी घटनाही उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे घडली आहे. रमेश निवृत्ती जाधव यांनी आपल्या गट क्र. ९७ मधील शेतात साैरऊर्जा संचाचे साहित्य बसविले हाेते. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने १० ते ११ जुलै या कालावधीत संचाचे साहित्य तसेच १५० फूट वायर लंपास केली. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी ढाेकी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Jagji, a swarm of fours in Wadgaon