मसापच्या वतीने इंगळे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:33+5:302021-07-11T04:22:33+5:30

उस्मानाबाद : साहित्यिक बालाजी मदन इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात ’ या काव्य संग्रहास प्रथम क्रमांक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ...

Ingle felicitated on behalf of MCA | मसापच्या वतीने इंगळे यांचा सत्कार

मसापच्या वतीने इंगळे यांचा सत्कार

उस्मानाबाद : साहित्यिक बालाजी मदन इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात ’ या काव्य संग्रहास प्रथम क्रमांक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने दिनांक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी वाङ्‌मय परिषद बडोदे (गुजरात) यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर काव्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यात इंगळे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त मसाचे उस्मानाबादचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र अत्रे, भा. न. शेळके, राम ढेरे, कालिदास म्हेत्रे आदींनी त्यांचा सत्कार केला. बालाजी इंगळे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कारासह इतर मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत

Web Title: Ingle felicitated on behalf of MCA