‘सुंदर माझं कार्यालय’ उपक्रमाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:08+5:302021-02-07T04:30:08+5:30
लोहारा : लोहारा (खु) येथे ‘सुंदर माझे गाव, सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी ...

‘सुंदर माझं कार्यालय’ उपक्रमाचे उद्घाटन
लोहारा : लोहारा (खु) येथे ‘सुंदर माझे गाव, सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी एस. ए. अकेले व सहायक गटविकास अधिकारी एस. एस. ढाकणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मुळे, विस्तार अधिकारी एस. एस. पाटील, विस्तार अधिकारी तथा प्रशासक व्ही. बी. पवार, के. डी. निंबाळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत परिसर व आरोग्य उपकेंद्र परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, शेखर पाटील, भास्कर रसाळ, व्यंकट रसाळ, सुग्रीव पाटील, सतीश रसाळ, संजय कारभारी, ज्ञानदेव मुरटे, अनिल पाटील, अजय रसाळ, गणेश रसाळ, पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी, छबाबाई रसाळ, मंदाकिनी रसाळ, मनीषा इंगळे, रोहन जमादार, विशाल जमादार आदी उपस्थित होते.