अकारण मुख्यालयी येणे ग्रामसेवक, शिक्षकांना भाेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:57+5:302021-02-07T04:29:57+5:30

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील सर्वात माेठी आस्थापना असलेल्या शिक्षण तसेच ग्रामपंचायत विभागात नेहमी वर्दळ असते. अनेक गुरुजींसह ग्रामसेवक अकारण ...

Gramsevaks and teachers will feel the need to come to the headquarters without any reason | अकारण मुख्यालयी येणे ग्रामसेवक, शिक्षकांना भाेवणार

अकारण मुख्यालयी येणे ग्रामसेवक, शिक्षकांना भाेवणार

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील सर्वात माेठी आस्थापना असलेल्या शिक्षण तसेच ग्रामपंचायत विभागात नेहमी वर्दळ असते. अनेक गुरुजींसह ग्रामसेवक अकारण अथवा किरकाेळ कामासाठी शाळा वा ग्रामपंचायत साेडून मुख्यालयी येतात. याअनुषंगाने ओरडही हाेत हाेती. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी कार्यालयात येणा-या प्रत्येकाची नाेंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे. या कामासाठी दाेन कर्मचारी नेण्यात आले आहेत. नाेंदीचा आढावा घेऊन अकारण मुख्यालयी येणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत येणा-या शिक्षण विभागाची सर्वात माेठी आस्थापना आहे. ग्रामपंचायत विभागाची आस्थापनाही ब-यापैकी आहे. त्यामुळे या दाेन्ही विभागांत सतत वर्दळ असते. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फड यांनी संबंधित विभागांना अचानक भेटी दिल्यानंतर गर्दीमुळे अनेकजण अकारण अथवा किरकाेळ कामासाठी आपली शाळा वा ग्रामपंचायत कार्यालय साेडून मुख्यालयी आले असल्याचे समाेर आले. एवढेच नाही तर याअनुषंगाने नेहमी ओरडही हाेते. अशा प्रकाराला कायमचा पायबंद घालण्यासाठी डाॅ. फड यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या दाेन्ही विभागांत दिवसभरात काेणकाेण येऊन गेले? त्यांचे काम काेणाकडे हाेते? दिवसभरात किती वेळा आले, या अनुषंगाने नाेंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे. नाेंदी ठेवण्यात सातत्य असावे, यासाठी दाेन कर्मचारी नेमण्यात आलेे आहेत. केवळ नाेंदी ठेवून न थांबता त्यांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. एखादे शिक्षक वा ग्रामसेवक एकाच टेबलप्रमुखाकडे अनेकवेळा आले असतील तर, त्यामागचे कारण शाेधले जाणार आहे. यात टेबलप्रमुखाची चूक समाेर आल्यास संबंधिताविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नाेंदींचा आढावा त्या-त्या विभागाचे वरिष्ठ घेणार आहेत. त्यामुळे आता अकारण मुख्यालयी येणा-या ग्रामसेवकांसह शिक्षक व अन्य कर्मचा-यांच्या अंगलट येऊ शकते.

चाैकट...

काही शिक्षक, ग्रामसेवक अकारण मुख्यालयी येतात. अनेक जण वरिष्ठांची रीतसर परवानगीही घेत नाहीत. ही बाब समाेर आल्यानंतरच आपण हा निर्णय घेतला आहे. यापुढे मुख्यालयात येणा-या प्रत्येकाची नाेंद ठेवली जाणार आहे. या नाेंदीचा आढावाही वेळाेवेळी घेतला जाईल. आढाव्याअंती जे दाेषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

-डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद

Web Title: Gramsevaks and teachers will feel the need to come to the headquarters without any reason