शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
4
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
5
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
6
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
7
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
8
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
9
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
10
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
11
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
12
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
13
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
14
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
17
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
18
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
19
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
20
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

उस्मानाबाद/ईट : मागील २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर भूम तालुक्यातील तीन, तर वाशी तालुक्यातील एका मंडळामध्ये साेमवारी रात्री अतिवृष्टी ...

उस्मानाबाद/ईट : मागील २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर भूम तालुक्यातील तीन, तर वाशी तालुक्यातील एका मंडळामध्ये साेमवारी रात्री अतिवृष्टी झाली. हा पाऊस खरीप हंगामातील साेयाबीनसारख्या नगदी पिकांसाठी लाभदायी असला तरी वादळी वाऱ्यामुळे ऊस, मक्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हाभरात मागील वीस ते पंचवीस दिवस पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, आदी पिके वाया गेली, तर साेयाबीनही करपण्याच्या मार्गावर हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या हाेत्या. असे असतानाच साेमवारी रात्री भूम तालुक्यात वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. भूमसह तीन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली आहे. यामध्ये भूम मंडळात सर्वाधिक १३५.८ मिलिमीटर पाऊस नाेंदविला गेला. साेबतच ईट मंडळातही ८० मिलिमीटर, आंबी मंडळात ७१.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे. तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा मंडळात ७९.८ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे ईटसह परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी लाभदायी मानला जात आहे. मात्र, दुसरीकडे ऊस तसेच मका ही दाेन्ही पिके आडवी झाली आहेत. या पावसामुळे भूजलस्तर उंचावण्यास मदत हाेईल, असे शेतकरी सांगताहेत.

चाैकट...

संरक्षक कठडा ढासळला...

ईटसह पाथरूड परिसरातही जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाथरूड जवळील घाटातील रस्त्यालगत असलेला संरक्षक कठडा ढासळला. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने कठडा बांधण्याची गरज आहे.

दहा तास वीज खंडित...

वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात हाेताच विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणकडून तांत्रिक बिघाड दूर न झाल्याने जवळपास दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागला.

दृष्टिक्षेपात पाऊस

तालुका मिमी

उस्मानाबाद २.१

तुळजापूर ८.१

परंडा १४.६

भूम ७१.७

कळंब ८.४

उमरगा ४.४

लाेहारा ६.०

वाशी ५९.१

एकूण १८.४