मोहा : कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून पाचशे वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. दररोज शंभर झाडे याप्रमाणे ही लागवड करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन हनुमंत मडके यांंच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांनी यंदा उसाचे वाढते क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून १ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कर्मचाऱ्यांच्या बळावर ते साध्य करणार असल्याचे सांगितले. तसेच बक्षीस स्वरूपात कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अधिक वेतन देणार असल्याचे जाहीर केले. कार्यकारी संचालक संतोष मडके यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके यांनी आभार मानले. यावेळी केजचे माजी नगराध्यक्ष हरूनभाई इनामदार, उपसरपंच सोमनाथ मडके, कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेकर मल्टी स्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख जावळे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कसबे तसेच कारखान्याचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत विशेषत: आंबा, नारळ, सप्तपर्णी, आवळा, चिंच, फणस, सीताफळ या झाडांची लागवड करण्यात येत आहे. याच्या संगोपनाची जबाबदारीदेखील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
100721\0351img-20210709-wa0053.jpg
मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज मधील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून कारखाना साइटवर वृक्षलागवड करताना