शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा सीएसआर समिती कागदावरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST

उस्मानाबाद : केंद्र व राज्य सरकार एकीकडे खेळवाढीसाठी विविध योजना राबवून क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

उस्मानाबाद : केंद्र व राज्य सरकार एकीकडे खेळवाढीसाठी विविध योजना राबवून क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र आजवर अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदकांसह पुरस्कार विजेते क्रीडापटू घडविणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोयीसुविधेअभावी झगडावे लागत आहे. यातच लातूर जिल्ह्यात यशस्वी झालेला क्रीडा सीएसआर उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याची क्रीडा क्षेत्रातून मागणी होत आहे.

क्रीडाजगतात उस्मानाबाद जिल्ह्याने स्वतःचे वलय निर्माण केले आहे. नेहमीच क्रीडा क्षेत्रात चढता आलेख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे आवश्यक सोयीसुविधेविना आहे त्या परिस्थितीत हताश न होता जिल्ह्यातील खेळाडू वर्षभर मैदानावर घाम गाळून स्पर्धेत आपले कौशल्य अजमावत चांगली कामगिरी बजावत असतो. मात्र, जिल्ह्यातील खेळाडू नेहमीच अत्याधुनिक सेवासुविधा व साहित्यापासून वंचित राहिलेला आहे. यातच खेळाडूंना सुविधा देण्याच्या बाबतीतही जिल्ह्याचा क्रीडा विभागही नेहमीच उदासीन राहिलेला आहे.

केंद्र शासनाने उद्बोधकांचे सामाजिक उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या दृष्टीने धोरणात सुधारणा करीत नफा कमाविणाऱ्या कंपनीने नफ्याच्या २ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे बंधनकारक केले आहे. या दृष्टीने राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उद्बोधकांचा सहभाग घेणे (सीएसआर) व याअंतर्गत कार्यान्वित होणाऱ्या क्रीडाविषयक प्रकल्पाचे समन्वय व संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धोरण तयार करीत जिल्हा, आयुक्त व राज्य स्तर समित्यांची संरचना करण्यात आली असून, समित्यांमध्ये क्रीडा संघटना व तज्ज्ञ व्यक्तींना सहभागी करून घेता येणार आहे. क्रीडा सीएसआर धोरणानुसार क्रीडा प्रबोधिनीमधील पायाभूत सुविधा बळकट करणे, क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्तीसह संकुलात अद्ययावत सुविधा उपलब्ध करणे, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, निपुणता क्रीडा केंद्र, क्रीडा वैद्यकीय केंद्र, फिटनेस केंद्र उभारणे, क्रीडा विकास निधीस साहाय्य करणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, उदयोन्मुख व प्रतिभावंत खेळाडूंना अर्थसाहाय्य करणे अशा खेळाडू अथवा संघांना दत्तक घेणे, खेळाडूंसाठी अद्ययावत प्रशिक्षण व साहित्याची उपलब्धता करणे, आहारातील विशिष्ट गरजा पुरविण्यासाठी साहाय्य करणे, खेळाशी निगडित वैद्यकीय सुविधा व विमा संरक्षण देणे, खेळाडूंना देशांतर्गत व देशाबाहेर प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धी करणे, यासह पारितोषिक विजेत्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देणे आदी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.

चाैकट...

जिल्ह्यातील सीएसआर समिती कागदावरच

जिल्ह्यात क्रीडा सीएसआर समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, ती फक्त कागदावरच. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, क्रीडा उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्रा.) व शिक्षणाधिकारी ( मा.) हे सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. समितीची आजतागायत एकही बैठक झालेली नसून हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आजतागायत कसलाही प्रयत्न केला गेला नसल्याने क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

काेट....

जिल्ह्यातील खेळाडूंसह क्रीडा विकासासाठी सीएसआर उपक्रम महत्त्वपूर्ण आहे; परंतु याबाबतीत प्रशासनास कसलेही गांभीर्य नसून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून या बाबतीत प्रामाणिक पावले उचलली गेली पाहिजेत.

- जावेद शेख, क्रीडा संघटक

आहे त्या सुविधेत सराव करून राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले याचा खूप आनंद होता; परंतु दर्जेदार साहित्याअभावी जागतिक धनुर्विद्या स्पर्धा निवडचाचणीतून बाहेर पडावे लागले. इथेच मी निराश झाले. सीएसआर उपक्रम राबविला गेला असता तर त्याचा फायदा माझ्यासह इतर अनेक प्रतिभावान खेळाडूंना झाला असता.

- आर्या वाले, राष्ट्रीय धनुर्धर