Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:17 IST2025-06-28T12:14:11+5:302025-06-28T12:17:21+5:30

धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता.

Dharashiv: Taking a bribe of Rs 95 thousand; PI Maruti Shelke, Constable Mukta Lokhande suspended | Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

धाराशिव : ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना सेवेतून निलंबित केले. मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबलकडून ९५ हजार रुपयांची लाच घेण्यात आली होती. या दोघांच्याही अटकेनंतर शुक्रवारी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दोघांनाही निलंबित केले.

धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक शेळके यांना गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने शेळके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर शेळके पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पुन्हा पकडले. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कळंबमधील कारकिर्दीची चर्चा...
मारुती शेळके कळंब येथे कार्यरत असतानाही त्यांनी काही प्रकरणांमध्ये असेच उद्योग केल्याची चर्चा होती. धाराशिव ग्रामीणला रुजू झाल्यानंतर येथेही ते उद्योग कायम ठेवले. अखेर घडा भरल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. सध्या कळंबमध्ये त्यांच्या तेथील कारकिर्दीची चवीने चर्चा केली जात आहे.

Web Title: Dharashiv: Taking a bribe of Rs 95 thousand; PI Maruti Shelke, Constable Mukta Lokhande suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.