शाळेच्या मैदानावरील वृक्षांची केली नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:39+5:302021-07-18T04:23:39+5:30

उमरगा : शहरातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर व श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय या शाळेच्या मैदानावर ‘सुंदर माझी शाळा, सुंदर ...

The destruction of the trees on the school grounds | शाळेच्या मैदानावरील वृक्षांची केली नासधूस

शाळेच्या मैदानावरील वृक्षांची केली नासधूस

उमरगा : शहरातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर व श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय या शाळेच्या मैदानावर ‘सुंदर माझी शाळा, सुंदर माझा परिसर, हरित शाळा’ या अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यातील फायकस जातीच्या सात-आठ फूट उंचीच्या सात झाडांची अज्ञाताकडून नासधूस करण्यात आली आहे.

१६ जुलैच्या रात्री ही घटना घडली असून, वर्षभर वाढवलेले हे वृक्ष मोडण्यात आल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे कार्यवाह डॉ .कपिल महाजन, संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुनप्पा दडगे, संस्थाचालक शिवाजी वडणे, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी याबाबत उमरगा पोलिसांना कल्पना दिली असून, संबंधित अज्ञात लोकांवर शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे. याबाबत उमरगा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Web Title: The destruction of the trees on the school grounds