आरोग्येतर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:07+5:302021-07-14T04:38:07+5:30

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संदर्भात आरोग्य, वैद्यकीय समस्यांशी लढण्यास अनेक यंत्रणा आहेत, परंतु इतर समस्या व ...

Demand for attention to non-health issues | आरोग्येतर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

आरोग्येतर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संदर्भात आरोग्य, वैद्यकीय समस्यांशी लढण्यास अनेक यंत्रणा आहेत, परंतु इतर समस्या व त्याचा युवकांवर होणारा परिणाम याबाबत एक स्वतंत्र यंत्रणा तातडीने निर्माण करणे गरजेचे आहे. प्रशासकीय, प्रशिक्षण, संवाद, सहभाग या चतुसूत्रीवर शासनाने काम करण्याची गरज आहे. सर्व बेरोजगारांची नोंदणी तातडीने करावी. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय असावेत. उपलब्ध माहितीतून वर्गवारी करावी. विविध आस्थापनांमध्ये असणाऱ्या नोकऱ्यांबाबत एक सक्षम दुवा असणारी व्यवस्था निर्माण करावी. तालुकास्तरावर छोट्या-मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती निर्माण कराव्यात, यासह विविध १८ मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावर शुभम मुळजकर, सागर स्वामी, अतुल गायकवाड, सुशीलकुमार शिंदे, साई टाचले आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for attention to non-health issues