शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील फिडरवर गेल्या पंधरा दिवसांपासून ‘लो व्होल्टेज’ वीजपुरवठा होत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे ...

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील फिडरवर गेल्या पंधरा दिवसांपासून ‘लो व्होल्टेज’ वीजपुरवठा होत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने विद्युत पंपात वारंवार बिघाड होत असून, विजेअभावी पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजली आहेत.

शिराढोण विद्युत उपकेंद्रातून रात्रपाळीमध्ये मध्यरात्री बारा ते पहाटेपर्यंत कमी दाबाने का होईना वीजपुरवठा होतो. परंतु दिवस निघाल्यापासून दर पंधरा मिनिटाला वीज खंडित होते. शिवाय, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत पंपात बिघाड होत असल्याने याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शिवाय, पिकांना पाणी पोहोचेपर्यंत वीज खंडित होत असल्याने पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना मिळत नाही. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. विहिरीचे पाणी कमी झाले असून, कूपनलिकेच्या विद्युत पंपातूनही सुरळीत पाणी उपलब्ध होत नसल्याने कडक उन्हामुळे पिके कोमेजू लागली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठ्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

प्रत्येक फिडर एक तास बंद

मुरुड येथील वीजपुरवठ्याचा भार वाढत असल्याने दिवस पाळीतील प्रत्येक फिडर एक तास बंद केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना आठ तासांऐवजी सात तास वीजपुरवठा होतो. त्यात इतर कारणाने वीज खंडित होत असल्याने पाच तासच सुरळीत वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

वीजपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडित होतो. सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी

आमचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांनी रोहित्राच्या आर्थिंगला पाणी देणे गरजेचे आहे.

- प्रवीण धुमाळ, कनिष्ठ अभियंता

शिराढोण उपकेंद्रातील तांत्रिक उपकरण खराब झाल्यास किंवा लाइन फाॅल्ट काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

- नामदेव माकोडे, संपर्कप्रमुख, रयत क्रांती

गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने विद्युत पंप, स्टार्टरचा बिघाड होत आहे. जलस्रोतातून पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके वाळून जात आहेत.

- नामदेव पुदाले, शेतकरी, पिंपरी (शि.)