शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र बाळगण्याची क्रेझ, जिल्ह्यात हजार परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

शस्त्र परवाना काढायचा कसा... शस्त्र परवाना काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची वेगवेगळ्या विभागामार्फत ...

शस्त्र परवाना काढायचा कसा...

शस्त्र परवाना काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची वेगवेगळ्या विभागामार्फत तपासणी होऊन खरेच अर्जदारास शस्त्राची गरज आहे का, हे शोधले जाते. त्यानंतर आलेल्या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी निर्णय घेत असतात.

उस्मानाबादेत सर्वाधिक, तर वाशीत कमी...

शस्त्र परवान्यांची संख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात आहे. त्यातही शहरात ही संख्या जास्त आहे. एकंदर तालुक्यात ३९० जणांकडे शस्त्र बाळगण्याचे परवाने आहेत.

यापाठोपाठ उमरगा तालुक्यात १६५, तुळजापूर तालुक्यात १३४ तर भूम तालुक्यात १११ शस्त्र बाळगण्याचे परवाने यापूर्वीच्या काळात देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सर्वात कमी परवाने हे वाशी तालुक्यात आहेत. येथे केवळ १५ जणांकडेच परवाने आहेत. लोहारा तालुक्यात १९, परंडा ६२ तर कळंब तालुक्यात ९३ जणांकडे शस्त्र बाळगण्याचे परवाने देण्यात आले आहेत.

नियम कडक झाल्याने इच्छुकांची कोंडी...

मागील साधारणत: पाच वर्षांमध्ये शस्त्र परवाना देण्याबाबतचे नियम काहीसे कठोर झाले आहेत. त्यामुळे सहजासहजी हे परवाने मिळत नाहीत. यापूर्वी महसूल, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेल्या लोकांना परवाना मिळविण्यात फारशी अडचण येत नव्हती. त्यामुळे फारसे सायास न करता जवळपास हजारेएक लोकांनी परवाने काढून घेतले आहेत.

पाच वर्षांत झाली संख्या कमी...

आजही शस्त्र मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड चालूच असते. विशेषत: राजकीय, उद्योग, व्यापार क्षेत्रातील लोकांकडून परवान्यांसाठी सर्वाधिक अर्ज केले जातात. मात्र, अर्ज आल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचे दिव्य पार पाडावे लागते. तसेच अर्जदार राहणाऱ्या क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविला जातो. खरेच अर्जदारास शस्त्राची गरज आहे का, याची चाचपणी केली जाते. या सर्व दिव्यातून जावे लागत असल्याने अलीकडच्या काळात संख्या घटली.

शस्त्र सांभाळणे कठीण...

शस्त्र परवाना मिळाल्यानंतर त्याच्या खरेदीपासून ते सांभाळ करण्यापर्यंतचे काम मोठे जोखमीचे आहे. वेळोवेळी आपल्याकडील शस्त्राची देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी लागते. प्रशासनाने निवडणूक व तत्सम वेळी शस्त्रे जमा करावी लागतात. तसेच घरात किंवा सोबत असतानाही ते चोरीस जाणार नाही, याची मोठी काळजी घ्यावी लागते. कारण, चोरीस गेल्यानंतर या शस्त्राच्या माध्यमातून एखादा गुन्हा चोरट्याने केल्यास हकनाक परवानाधारक चौकशीच्या फेऱ्यात अडकतो.