शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

Corona Virus : उस्मानाबादच्या कारागृहात कोरोनाचा उद्रेक; २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 7:29 PM

Corona Virus: सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील २७२ कैद्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते.

ठळक मुद्दे उर्वरित कैद्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेतपाच दिवसांनंतर त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. वर्षभरापासून कोरोना संसर्गास रोखलेल्या कारागृहात कोराेना विषाणूने प्रवेश केला असून, दोन दिवसांत तब्बल २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहाची क्षमता २६९ इतकी आहे. सध्या विविध गुन्ह्यांतील २७२ कैदी आहेत. मागील वर्षभरात कारागृहात एकही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आला नव्हता. मात्र, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील २७२ कैद्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. शुक्रवारी तपासणीत ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ८४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले, तर रविवारी १४ रुग्णांचा अहवाल अहवाल आला. अशा एकूण २७२ कैद्यांपैकी १२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून कारागृहातच औषधोपचार सुरू केले आहेत. उर्वरित कैद्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी पाच दिवसांनंतर त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉक्टर म्हणाले. दरम्यान, याबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

रुग्णांना कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले जिल्हा रुग्णालयातील २७२ कैद्यांची शुक्रवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी सहा डॉक्टर, कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची पाच दिवसांनंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.- डाॅ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद