सेवानिवृत्तीबद्दल वसंत बाबरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:43+5:302021-07-02T04:22:43+5:30

मुरूम : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल रुग्णालय कर्मचारी व शहरातील खाजगी डॉक्टर, राजकीय ...

Congratulations to Vasant Babare on his retirement | सेवानिवृत्तीबद्दल वसंत बाबरे यांचा सत्कार

सेवानिवृत्तीबद्दल वसंत बाबरे यांचा सत्कार

मुरूम : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल रुग्णालय कर्मचारी व शहरातील खाजगी डॉक्टर, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार संघटना तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत डुकरे, डॉ. दाणे, शहरातील डॉ. विजयानंद बिराजदार, डॉ. नितीन डागा, डॉ. शिवकुमार कारडामे, डॉ. चिलोबा, डॉ. चव्हाण, डॉ. महेश स्वामी, माजी नगरसेवक दत्ता इंगळे, राजू भालकटे, युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी, पत्रकार महेश निंबरगे, रवी आंबूसे, सहशिक्षक शिवाजी कवाळे आदी उपस्थित होते. या वेळी ग्रामीण रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर आणि कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबरे यांचा सपत्नीक सत्कार केला.

Web Title: Congratulations to Vasant Babare on his retirement