वीकेंड लॉकडाऊनला उमरगा शहरात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:36+5:302021-04-12T04:30:36+5:30

कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन घोषित ...

City of Umarga responds to weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनला उमरगा शहरात प्रतिसाद

वीकेंड लॉकडाऊनला उमरगा शहरात प्रतिसाद

कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन घोषित केला. या काळात केवळ दूधविक्री, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. त्यानुसार, उमरगा शहरात शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत परवानगी असलेलीच प्रतिष्ठाने व दवाखाने सुरू होते. अन्य बाजारपेठा पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होता. संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करतात. अशांना आवरण्यासाठी उमरगा पोलिसांनी शनिवार व रविवारी शहरातील मुख्य चौकात चांगलीच फिल्डिंग लावली होती. शहरातील अशोक चौक, पतंगे रोड, डिग्गी रोड, शिवाजी चौक, इंदिरा चौक याठिकाणी पोलिसांनी फिक्स पॉइंट लावले होते. यासोबतच पेट्रोलिंगसाठी दोन वेगवेगळ्या पथकांचे गठण केले होते. दिवसभर शहरातील गल्लीबोळात पेट्रोलिंग करून बाहेर कुणी पडणार नाही, याची खबरदारी घेतली.

Web Title: City of Umarga responds to weekend lockdown