सीईओ गुप्ता यांनी लगावला ‘मास्टर स्ट्राेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:32+5:302021-07-08T04:22:32+5:30

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी सावंत हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते सेवानिवृत्त हाेण्यापूर्वीच राजकीय नेतेमंडळींत वावर ...

CEO Gupta launches 'Master Strike' | सीईओ गुप्ता यांनी लगावला ‘मास्टर स्ट्राेक’

सीईओ गुप्ता यांनी लगावला ‘मास्टर स्ट्राेक’

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी सावंत हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते सेवानिवृत्त हाेण्यापूर्वीच राजकीय नेतेमंडळींत वावर असणारे व प्रशासनातील वरिष्ठ कार्यालयात बऱ्यापैकी ओळख असणाऱ्या काही कक्ष अधिकाऱ्यांनी जाेरदार फिल्डिंग लावली हाेती. मागील तीन-चार दिवसांत तर हे पद मिळावे, म्हणून इच्छुक असलेल्या मंडळीने खूप जाेर लावला. काहींसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून फाेन आल्याची चर्चा हाेती तर काहींसाठी लाेकप्रतिनिधींनीही आग्रह धरल्याचे समजते. आठ कक्ष अधिकाऱ्यांपैकी दाेघेजण तर आपलीच वर्णी लागणार, असे ठामपणे सांगत हाेते. दरम्यान, हा मुद्दा नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासमाेर बुधवारी गेला. आजवर घडल्याप्रमाणे त्यांनी केवळ संचिकेतील माहितीवर अवलंबून न राहता, सर्व आठही कक्ष अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बाेलावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी हजर झाले. यावेळी त्यांनी प्रत्येक कक्ष अधिकाऱ्यांची ज्येष्ठता तपासली. एवढेच नाही तर त्यांच्याशी चर्चाही केली. ‘काेण किती पाण्यात आहे’, हेही जाेखले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर संबंधितांचे ‘सीआर’ही पाहिले. या सर्व चाळणी प्रक्रियेतून मागील काही दिवसांपासून गुडग्याला बाशिंग बांधून बसलेले गळून पडले आणि पात्र असलेल्या अधिकाऱ्यास या पदाची लाॅटरी लागली. सीईओंनी राबविलेली ही पारदर्शक प्रक्रियेची जिल्हा परिषदेच्या आवारात दिवसभर चर्चा सुरू हाेती.

Web Title: CEO Gupta launches 'Master Strike'