तेरखेडा -स्टाेअर रूमची खिडकी केली चाेरी
येरमाळा : वाशी तालुक्यातील तेरेखडा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेले बिअर बार फाेडून अज्ञात चाेरट्यांनी मालकास बेदम मारहाण केली. यानंतर स्टाेअर रूमची खिडकी ताेडून गल्ल्यातील राेख २५ हजार तसेच दारूचे बाॅक्सही लंपास केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथून जाणाऱ्या सोलापूर-धुळे महामार्गाच्या बाजूस असलेल्या आरुष नावाचा बिअर बार आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने बारच्या गेटचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यानंतर आत झाेपलेले बार मालकाचे वडील मिठू घुले यांना बेदम मारहाण केली. यानंतर गल्ल्यातील सुमारे २५ हजार रुपये घेतले. तसेच स्टाेअर रूमची खिडकी ताेडून आतील सुमारे ७० हजार रुपये किमतीची दारू लंपास केली. याप्रकरणी येरमाळा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.