श्वानास आवरण्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST2021-07-10T04:23:06+5:302021-07-10T04:23:06+5:30
परस्परविराेधी तक्रारीवरून गुन्हा दाखल उस्मानाबाद : भूम तालुक्यातील नान्नजवाडी येथील श्रीमंत अच्युत माने व भरत आश्रुबा भसाड या दाेन्ही ...

श्वानास आवरण्याच्या कारणावरून मारहाण
परस्परविराेधी तक्रारीवरून गुन्हा दाखल
उस्मानाबाद : भूम तालुक्यातील नान्नजवाडी येथील श्रीमंत अच्युत माने व भरत आश्रुबा भसाड या दाेन्ही कुटुंबीयात ७ जुलै राेजी ग्रामपंचायत कार्यालयासमाेर वाद झाला. यावेळी दाेन्ही गटांनी परस्परविराेधी गटांतील महिला व पुरुषांना शिवीगाळ केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही, तर काठी व काेयत्याने मारून जखमी केले. या प्रकरणी दाेन स्वतंत्र तक्रारींवरून संबंधितांविरुद्ध भादंसंचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये भूम पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
शिक्षिकेचा विनयभंग, तरुणाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका विवाहित शिक्षिकेचा तरुणाने दुचाकीवरून पाठलाग करून, विनयभंग केल्याची घटना ६ जुलै राेजी घडली. याबाबत शिक्षिकेच्या पतीने तरुणाच जाब विचारला असता, संबंधित तरुण व साेबत आलेल्या अन्य एकाने शिक्षिकेसह पतीस धमकी देऊन धक्काबुक्की केली. या प्रकरणी शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ तरुणाविरूद्ध भादंसंचे कलम ३२३, ३५४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.