नियुक्तीस हाेतेय टाळाटाळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:48+5:302021-02-05T08:19:48+5:30

उस्मानाबाद : येथील जिल्हा हिवताप कार्यालयातील मयत कर्मचाऱ्याच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी, असे आदेश सहसंचालकांनी ७ जानेवारी राेजी ...

Avoid appointments? | नियुक्तीस हाेतेय टाळाटाळ?

नियुक्तीस हाेतेय टाळाटाळ?

उस्मानाबाद : येथील जिल्हा हिवताप कार्यालयातील मयत कर्मचाऱ्याच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी, असे आदेश सहसंचालकांनी ७ जानेवारी राेजी दिले आहेत. परंतु, वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लाेटूनही जिल्हा कार्यालयाने नियुक्ती दिली नाही. त्यामुळे संबंधिताने थेट सीईओंकडे धाव घेतली.

जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील एका कर्मचाऱ्याचे २०१४ मध्ये निधन झाले हाेते. त्यांच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी संचालक कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला हाेता. याच्या आधारे ७ जानेवारी राेजी सहसंचालक डाॅ. एन. डी. देशमुख यांनी ७ जानेवारी राेजी स्वतंत्र आदेश काढून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. परंतु, २० ते २२ दिवसांचा कालावधी लाेटूनही रिक्त जागा असतानाही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे संबंधित मयत कर्मचाऱ्याचा ‘ताे’ मुलगा कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. यासंदर्भात संबंधित तरूणाने ‘सीईओ’ डाॅ. फड यांच्याकडे धाव घेतली.

Web Title: Avoid appointments?