शवविच्छेदन खोलीला काटेरी गवत, झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:28+5:302021-07-19T04:21:28+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन खोलीला काटेरी गवताने वेढा घातला असून, तिथे दिवाबत्ती, पाण्याचीही सोय ...

The autopsy room was overgrown with thorns and thistles | शवविच्छेदन खोलीला काटेरी गवत, झुडपांचा विळखा

शवविच्छेदन खोलीला काटेरी गवत, झुडपांचा विळखा

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन खोलीला काटेरी गवताने वेढा घातला असून, तिथे दिवाबत्ती, पाण्याचीही सोय नसल्याचे दिसून येते.

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावे येतात. येथील ४५ हजार लोकसंख्येच्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. अपघातासह विविध घटनांत मृत्यू झालेल्या मृतांचे शवविच्छेदन येथे पार पडले. येथील शवविच्छेदन खोली दवाखान्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर केमवाडी रस्त्यालगत असून, या खोलीला काटेरी झाडे, गवताने वेढा घातला आहे. याच खोलीच्या भोवताली घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे. काटेरी गवतामुळे मृतदेहही त्या खोलीत घेऊन जाता येत नाही. तिथे पाणी व दिवाबतीची कसलीही सोय नाही. त्यामुळे शवविच्छेदन खोलीभोवतालची स्वच्छता करण्याची गरज आहे. शिवाय, सावरगाव दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आरोग्य विभागाचा अधिकृत कर्मचारी नाही. त्यामुळे येथे खासगी व्यक्तीकडून हे काम करून घ्यावे लागत आहे.

Web Title: The autopsy room was overgrown with thorns and thistles