घरफाेडी, लुटीच्या तेरा गुन्ह्यांतील आराेपीस बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:34+5:302021-07-08T04:22:34+5:30

उस्मानाबाद -घरफाेडीसह लुटीच्या जवळपास तेरा गुन्ह्यातील एका आराेपीस ६ जुलै राेजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून बेड्या ठाेकण्यात आल्या. त्याच्याकडून ...

Arrested in thirteen cases of burglary and robbery | घरफाेडी, लुटीच्या तेरा गुन्ह्यांतील आराेपीस बेड्या

घरफाेडी, लुटीच्या तेरा गुन्ह्यांतील आराेपीस बेड्या

उस्मानाबाद -घरफाेडीसह लुटीच्या जवळपास तेरा गुन्ह्यातील एका आराेपीस ६ जुलै राेजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून बेड्या ठाेकण्यात आल्या. त्याच्याकडून सुमारे ८ लाख ४६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील आराेपी किरण विलास भाेसले हा घरफाेडी, लुटीच्या गुन्ह्यात पाेलिसांना हवा हाेता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर हाेते. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पाेनि गजानन घाडगे, पाेउपनि माने, भुजबळ, पाेना सय्यद, पाेकाॅ. जाधवर, मारलापल्ले, आरसेवाड, ढगारे, ठाकूर यांच्या पथकाने ६ जुलै राेजी आराेपी भाेसले यास ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता, अन्य सहकाऱ्यांसह नळदुर्ग ठाण्याच्या हद्दीत ५, लाेहारा ३, तुळजापूर २, उमरगा, बेंबळी, आनंदनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा बारा घरफाेड्या व एक लूटमारीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातून सुमारे १६० ग्रॅम साेन्याचे दागिने, ज्याची किंमत ७ लाख ५२ हजार रूपये, ८० ग्रॅम चांदी (किंमत ५२००) व राेख ८९ हजार रूपये असा एकूण ८ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, पाेलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शाेध घेत आहेत.

Web Title: Arrested in thirteen cases of burglary and robbery