सलून व्यवसाय सुरू करण्यास मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:56+5:302021-04-11T04:31:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भूम : शहरासह तालुक्यातील सलून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास परवानगी देऊन नाभिक समाजाची होत असलेली पिळवणूक ...

सलून व्यवसाय सुरू करण्यास मंजुरी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भूम : शहरासह तालुक्यातील सलून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास परवानगी देऊन नाभिक समाजाची होत असलेली पिळवणूक थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नाभिक समाजाने तहसीलदारांकडे केली आहे.
‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली प्रशासनाने विविध नियम आखून अनेक निर्बंध लावले आहेत. परिणामी नाभिक समाजातील गोरगरीब व्यावसायिकांची दुकाने बंद झाली आहेत. यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. हा प्रश्न लक्षात घेत प्रशासनाने सलून व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच सलून व्यावसायिकांना सरसकट कोरोना लस देण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे भूम तालुकाध्यक्ष दादासाहेब राऊत, विकास यादव, जिल्हा संघटक दत्तात्रय शिंदे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, राकेश चौधरी, युवक शहराध्यक्ष दिगंबर सांगळे, संजय चौधरी, संभाजी चौधरी, नवनाथ यादव, सुनील चौधरी, तानाजी शिंदे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.