रस्त्यावर वाहन उभे करणे आले अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:55+5:302021-02-08T04:28:55+5:30

ढोकी येथे दारू अड्ड्यावर धाड उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील एका दारू अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ फेब्रुवारी ...

Anglat came to park the vehicle on the road | रस्त्यावर वाहन उभे करणे आले अंगलट

रस्त्यावर वाहन उभे करणे आले अंगलट

ढोकी येथे दारू अड्ड्यावर धाड

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील एका दारू अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी धाड टाकली. यात मनिषा चव्हाण यांच्याजवळ एका कॅनमध्ये ९ लीटर अवैध गावठी दारू आढळून आली. पथकाने दारू जप्त करून संबंधितांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला.

३६१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाया

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६१ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाया जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने विविध मार्गावर करण्यात आल्या. या वाहनचालकांकडून ८८ हजार १०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या चालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.

जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुद्ध गुन्हा

उस्मानाबाद : परंडा येथील एका जुगार अड्ड्यावर परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी छापा टाकला. यात परंडा येथील हनीफ मोहिदी चाबरू याच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व २०० रुपये आढळून आले. पथकाने जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करून संबंधिताविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

Web Title: Anglat came to park the vehicle on the road