वीज चोरणाऱ्या दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST2021-07-10T04:23:05+5:302021-07-10T04:23:05+5:30

उस्मानाबाद : महावितरणच्या एलटी लाईनवर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दंड भरण्यास सूचित केल्यानंतरही ...

Action against two power thieves | वीज चोरणाऱ्या दोघांवर कारवाई

वीज चोरणाऱ्या दोघांवर कारवाई

उस्मानाबाद : महावितरणच्या एलटी लाईनवर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दंड भरण्यास सूचित केल्यानंतरही त्याकडे कानाडोळा केल्याने गुरुवारी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

उस्मानाबाद तालुक्यातील नांदगाव येथील बाळासाहेब नामदेव घंटे व महेशकुमार जवाहर चिनगंडे हे दोघे आकडा टाकून विजेची चोरी करीत होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता, मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर महावितरणकडून दोघांनाही विद्युत कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांत चोरलेल्या विजेचे देयक व दंड रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, दोघांनीही याकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर सहायक अभियंता प्रवीण गायकवाड यांनी उस्मानाबाद ग्रामीण ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दोघांविरुद्ध वीज चोरीच्या स्वतंत्र तक्रारी दिल्या. त्यावरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action against two power thieves