आरोग्य केंद्राकडून अबेटिंग मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:31+5:302021-07-19T04:21:31+5:30

(फोटो : दयानंद काळुंके १८) अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात चिकनगुनियाला रोखण्यासाठी वाॅर्डनिहाय अबेटिंग ...

Abating campaign started from the health center | आरोग्य केंद्राकडून अबेटिंग मोहीम सुरू

आरोग्य केंद्राकडून अबेटिंग मोहीम सुरू

(फोटो : दयानंद काळुंके १८)

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात चिकनगुनियाला रोखण्यासाठी वाॅर्डनिहाय अबेटिंग मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अणदूर येथे चिकनगुनियासदृश्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तांडे, वाड्या वस्त्यांवर, आणि गल्लोगल्लीत या आजाराने नागरिक त्रस्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रविवारी तातडीची बैठक घेऊन गावात अबेटिंग मोहीम सुरू करण्यात आली. यात शिक्षक कॉलनी, मधुशाली नगर, धनगर गल्ली, वडार वस्ती, चर्मकार वस्ती, काळा मारुती परिसर, भीमनगर, सिध्दार्थ नगर, महादेव गल्ली, पुजारी गल्ली, विश्वनाथ नगर या भागात घरोघर सर्व्हे करून चिकनगुनिया रुग्णाचा शोध घेणे, डास, अळ्याची जागा शोधून ॲबेट टाकणे, गटारी, घरातील पिंप तपासणे, त्यावर कीटकनाशक औषधे टाकणे, लोकांना घरातील भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, चिकनगुनियाची लक्षणे असतील तर रक्त तपासून घेऊन उपचार करणे व चिकनगुनिया निर्मूलनासाठी व प्रतिबंधासाठी जनजागृती आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून सुरू आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे, डॉ. अक्षय जानकर, आरोग्य पर्यवेक्षक डी. आर. कदम, के. एम. पाटील, परिचारीका संगीता क्षीरसागर, आशा कार्यकर्ती सुरेखा कांबळे, शिवशाला घुगे, जयश्री तळवार, संगीता किरात, मनीषा कांबळे, आशा बोर्डे, आरोग्य कर्मचारी एस. पी. सुरवसे, एन. आर. ढोकळे, एन. एन. डांगे, एम. ए. काझी, उमेश कदम यांच्यासह आशा कार्यकर्त्यां व आरोग्य कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Abating campaign started from the health center