शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात १५ जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

संतोष मगर, तामलवाडी तुळजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असुविधांचा अभाव आहे़ जागोजागी साईडपट्ट्या वितभर खचल्या आहेत़ वाहनांच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नाही

संतोष मगर, तामलवाडीतुळजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असुविधांचा अभाव आहे़ जागोजागी साईडपट्ट्या वितभर खचल्या आहेत़ वाहनांच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि दुरूस्तीच्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची दुरवस्था कायम आहे़ त्यामुळे तुळजापूर ते तामलवाडी या २२ किमी अंतरावर पाच महिन्यात १५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे़ सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी-तुळजापूर हे २२ किलोमीटर अंतर दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे़ तामलवाडी पोलिस ठाण्याकडे यातील १२ कि़मी़चे अंतर येते़ समा महिन्यापूर्वी सांगवी मार्डी शिवारात सहलीच्या बसला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता़ अनेकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेनंतरही वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण न ठेवता, वळणांकडे दूर्लक्ष करण्याचा प्रकार सुरूच ठेवल्याचे दिसत आहे़ या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे़ सांगवी पाटी गावानजीक प्रत्येक आठवड्याला गतिरोधकाजवळ वाहन अडकून किमान एक तरी अपघात होतो़ सुरतगाव जवळील वळणावर काटेरी झाडांच्या फांद्यांमुळे रस्ता दिसेनासा होतो़ हे फाटे तोडणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्री तेथील अंदाज चालकांना येत नाही़ सुरतगावजवळ वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडेलेली बाभळीची झाडे अद्याप तसेच आहेत़ माळुंब्रा-पुलावर एक महिन्यापूर्वी केलेले डांबरीकरण उखडून रस्ता खचू लागला आहे़ हे काम निकृष्ट की चांगले याबाबत कोणताच अधिकारी बोलत नाही, त्यामुळे त्याचे गौडबंगाल अद्याप कोणालाच कळू शकले नाही़ सिंदफळ शिवारात ना वळण, ना अरूंद रस्ता. तरीही बुधवारी रात्री अपघातात तिघांना जीव गमवावा लागला़ दिवसेंदिवस होणारे अपघात, त्यात होणारे मृत्यू आणि अनेकांना कायम येणारे अपंगत्व या बाबी कमी करण्यासाठी बांधकाम विभागाने आवश्यक ती पावले उचलून रस्त्याची कामे करण्याची गरज व्यक्त होत आहे़ बेधुंद चालकांवर कारवाईची गरजरात्रीच्या वेळी वेगावर नियंत्रण न ठेवता, मद्यप्राशन करून वाहने चालविली जात असल्याने अपघात होतात हे वारंवारच्या घटनांमुळे समोर आले आहे़ या अपघातात दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांचाही बळी जातो़ त्यामुळे रात्रीच्या वेळीही ठिकठिकाणी अशी बेधुंद वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे़सप्ताहापुरती मोहीमजानेवारी महिन्यात शासनाच्या आदेशानुसार १५ दिवस रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो़ यात चालकांची नेत्र तपासणी, वाहतुकीचे नियम, सुरक्षा आदी शिबिरातून जनजागृती केली जाते़ नंतरचे ११ महिने याबाबतची जनजागृती करण्याकडे प्रशासन दुर्लक्षच करते़ केवळ ‘पावत्या’ फाडण्यावर अनेकांचा भर असल्याचे दिसून येत आहे़अपघातप्रवण क्षेत्रात असुविधाया महामार्गावर तामलवाडी, सुरतगाव, माळुंब्रा, सांगवी (काटी), सांगवी (मार्डी) शिवारात बांधकाम विभागाकडूनच अनेक अपघातप्रवण क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत़ गतिरोधकाजवळ वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासह इतर आवश्यक त्या उपाययोजनांची गरज आहे़ शिवाय रूग्णवाहिका नसल्याने अपघातानंतर जखमींना रूग्णालयात नेताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे सपोनि राजेंद्र बोकडे यांनी सांगितले़सरहद्दीवरच होतेय वाहनांची तपासणीसोलापूर- तामलवाडी हे २२ किमीचे अंतर आहे़ येथे सरहद्दीवर कसलीही वाहतुकीची कोंडी नाही, चौक नाही तरीही वाहतूक पोलिसांचा पोशाख परिधान करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली जात आहे़ एका माध्यमातून पोलिसांची सुरू असलेली तपासणी योग्य असली तरी वाहन चालकांकडून दिवसा-ढवळ्या आर्र्थिक लूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़