शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

१०७ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत चार ते पाच महिने एसटीची बससेवा ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत चार ते पाच महिने एसटीची बससेवा बंद होती. रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बससेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा धोका टळला नसल्याने नागरिक प्रवास करणे टाळत होते. प्रवाशाच्या सुरक्षेसाठी महामंडळाने बसेस ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग करण्याचे काम हाती घेतले. कोटिंग झालेल्या बसेसमधून प्रवास करणे सुरक्षित मानले जात आहे. जिल्ह्यात १०७ बसचे कोटिंगचे काम झाले आहे, तर उर्वरित बसेसचे काम सुरू आहे.

एका एसटीला वर्षातून सहावेळा होणार कोटिंग

उस्मानाबाद विभागाच्या एकूण सव्वा चारशेच्या जवळपास बसेस आहेत. यापैकी २७६ बसेसचे ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग केेले जात आहे. १०७ बसेसचे कोटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बसेसचे दर दोन महिन्यांनी कोटिंग करण्यात येणार आहे. असे एकूण वर्षात सहा वेळेस कोटिंग केली जाणार आहे.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास?

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. बसमध्ये आसनाच्या बाजूलाच बाधित व्यक्ती बसला असेल तर स्वत: मास्क लावावा व संबंधित व्यक्तीस मास्क लावण्यास सांगावे.

कोट...

उस्मानाबाद विभागातील बस गाड्यांची ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया केली जात आहे. सध्या काही बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे. कोटिंगमुळे थुंकीतून, शिंकातून जंतूसंसर्ग फैलावणार नाही. वर्षातून सहावेळा एका बसचे कोटिंग केले जाईल.

अमृता ताह्मणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद

प्रवासी काय म्हणतात..

कोरोनाकाळात प्रवास करणे धोक्याचे वाटते. त्यामुळे प्रवास करणे टाळत होतो. आता एसटीने कोटिंग केल्याने बसमधून प्रवास करणार आहे. सोबतच मास्कचा वापरही सुरूच ठेवणार.

अमोल गायकवाड, प्रवासी

रुग्णसंख्या कमी झाल्याने एसटीची बससेवा सुरू आहे. या कोरोनाचा संसर्गाचा धोका अद्याप धोका टळला नाही. त्यामुळे प्रवास करताना मास्क नियमित वापर करीत आहे. कोटिंगमुळे अन्य वाहनांच्या तुलनेत बसच्या प्रवासास पसंती देणार.

अनिकेत वाघमारे, प्रवासी

आगारनिहाय संख्या

उस्मानाबाद ९० ५८

उमरगा ७७ ५८

भूम ६९ ४०

तुळजापूर ९५ ५८

कळंब ८९ ४८

परंडा ४४ २१