१०१ ग्रामस्थांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:38+5:302021-04-12T04:30:38+5:30

परंडा : तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त रविवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

101 villagers donated blood | १०१ ग्रामस्थांनी केले रक्तदान

१०१ ग्रामस्थांनी केले रक्तदान

परंडा : तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त रविवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिर घेण्यात आले. याची सुरुवात मारुती अंबऋषी जाधव यांच्या रक्तदानाने झाली. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी सरपंच कुमार वायकुळे, उपसरपंच केदार पाटील, पोपट चोबे, संजय पवार, विजय नवले, वन अधिकारी रोहित चोबे, डॉ. विकास पवार, ज्ञानेश्वर देवराम, मुकुंद चोबे, आबासाहेब मुके, बिरमल बोबडे, विशाल झोरी, नीलेश चोबे, बालाजी पाटील, दत्ता वायकुळे, रणजित चोबे, उमेश जाधव, मनोज घवले, दादा दिवटे, संतोष काटकर, सखाराम मिसाळ, कांतीलाल पवार, प्रदीप देवराम, सागर पाटील, सुमेर जाधव, अविनाश काटकर, आदी उपस्थित होते.

Web Title: 101 villagers donated blood