ब्रेकअपनंतर चिडलेल्या बॉयफ्रेन्डने दिली जीवे मारण्याची धमकी आणि नंतर केला हा कारनामा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 10:34 AM2021-02-08T10:34:15+5:302021-02-08T10:38:21+5:30

ही धक्कादायक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली. येथील एका तरूणीने एक्स-बॉयफ्रेन्डची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

Youth sets his ex lover scooty on fire in Bengaluru | ब्रेकअपनंतर चिडलेल्या बॉयफ्रेन्डने दिली जीवे मारण्याची धमकी आणि नंतर केला हा कारनामा....

ब्रेकअपनंतर चिडलेल्या बॉयफ्रेन्डने दिली जीवे मारण्याची धमकी आणि नंतर केला हा कारनामा....

Next

गर्लफ्रेन्डसोबत ब्रेमिुकअप झाल्याने नाराज झालेल्या एका सनकी प्रियकराने प्रेयसीचा धडा शिकवण्यासाठी तिच्या दुचाकीला आग लावली. त्याच इतक्यावरच मन भरलं नाही तर त्याने प्रेयसीला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही धक्कादायक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली. येथील एका तरूणीने एक्स-बॉयफ्रेन्डची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

आईचा विरोध असल्याने सोडली साथ

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, आरोपी संजयने ब्रेकअपनंतर तिला जीवे मारण्याची धमकी तर दिलीच सोबतच तिच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली. तरूणीने सांगितले की, साधारण वर्षभरापूर्वी तिच्या आईला दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत कळालं होतं. आईचा या रिलेशनशिपला विरोध होता. त्यानंतर तिने बॉयफ्रेन्ड सोबतचं नातं तोडलं होतं. (हे पण वाचा : अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या)

ब्रेकअपनंतर तो चिडला

ब्रेकअपनंतर आरोपी संजय विचित्र वागू लागला होता. पीडित तरूणी म्हणाली की, 'तो ब्रेकअप झाल्यापासूनच तिला मेंटली टॉर्चर करत होता. गेल्या महिन्यात १२ जानेवारीला तो तिच्या घरी आला होता आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गेला'. (हे पण वाचा : 'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला)

दुचाकीला लावली आग

तरूणीने आपल्या तक्रारीत सांगितले की, संजयने गेल्या २ जानेवारीला तिच्या स्कूटीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. तरूणीने सांगितले की, तिचा गाडी घराबाहेर उभी होती. पोलिसांनी एफआयआऱ दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
 

Web Title: Youth sets his ex lover scooty on fire in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.