गांजा पिऊ नका सांगितल्याने तरुणांनी खांबाला डोके आपटून तरुणाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 19:56 IST2021-02-02T19:54:22+5:302021-02-02T19:56:09+5:30
Murder : उल्हासनगरात गांजा पिण्याची मनाई जीवावर बेतली

गांजा पिऊ नका सांगितल्याने तरुणांनी खांबाला डोके आपटून तरुणाची केली हत्या
उल्हासनगर : साईनाथ येथील एका ठिकाणी हाफिज शेख यांनी काही तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. या रागातून नशेखोरांनी हाफीजला मारहाण करून त्याचे डोके विद्युत खांबाला आपटले. यातच तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरातील साईनाथ कॉलनी येथील एका जागी सोनूसह अन्यजन मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता गांजा पीत होते. यावेळी हाफिज शेख याने नशेखोर तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. याचा राग येऊन सोनूसह अन्य जनांनी हाफिज शेख याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याचे डोके हेजारील विधुत खांबाला मारल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी सोनू नावाच्या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केला. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी ४०० रुपयांच्या उदारीच्या भांडणातून खून झाल्याची माहिती देऊन एकाला अटक केल्याचे सांगितले.
हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या शरजीलवर कठोर कारवाई करा; फडणवीस आक्रमक