नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:34 PM2021-02-02T13:34:31+5:302021-02-02T13:35:17+5:30

Crime News : त्याबाबत २९ जानेवारी रोजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याकडे तक्रार केली . 

Complainant troubled by the police in the case of illegal board of corporator | नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

Next
ठळक मुद्देएका नगरसेवकाशी संबंधित फलक असल्याने पोलिसांनी फिरवाफिरव चालवली असल्याचा आरोप माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला आहे . 

मीरारोड - बेकायदेशीर जाहिरात फलक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्या संदर्भात दिलेल्या आदेशांचे भाईंदर पोलिसांकडून उल्लंघन केले जात आहे. एका नगरसेवकाशी संबंधित फलक असल्याने पोलिसांनी फिरवाफिरव चालवली असल्याचा आरोप माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला आहे . 

खोटी पटसंख्या दाखवत कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला

भाईंदर पश्चिमेस मुर्धा पालिका शाळेच्या कुंपण भिंत व सार्वजनिक वीजखांबावर बेकायदेशीर जाहिरात फलक लावण्यात आला होता. सदर जाहिरात फलक हा शाळे लगत राहणारे नगरसेवक जयेश भोईर यांच्या कुटुंबीयांच्या स्थळाचा होता. त्याबाबत २९ जानेवारी रोजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी भाईंदर  पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याकडे तक्रार केली . 

मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

भोसले यांनी उपनिरीक्षक प्रकाश पार्टे यांना सुवर्णा यांच्या सोबत घटनास्थळी पाठवले व तेथे पार्टे यांनी भानुदास भोईर यांना बोलावून फलक काढा व पोलीस ठाण्यात या असे सांगितले .  दुसऱ्या दिवशी सुवर्णा हे गुन्हा दाखल झाला का याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. निरीक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन पोलिसांची जबाबदारी असल्याचे सांगितले. परंतु १ फेब्रुवारी रोजी देखील पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने वसई येथे जाऊन पोलीस उपायुक्त संजय पाटील यांना भाईंदर पोलिसांनी कर्तव्यात कसूर करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ चालवल्याची तक्रार दिली असल्याचे सुवर्णा म्हणाले. 

Web Title: Complainant troubled by the police in the case of illegal board of corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.