Suicide : युवकाने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:14 IST2021-06-04T18:05:26+5:302021-06-04T18:14:28+5:30

Suicide Case : घरामध्ये आई- वडील आणि दोन भाऊ असे कुटुंब राहातात. शुक्रवारी मोठा भाऊ व आई-वडील शेतात गेले.

The youth committed suicide by hanging himself at home | Suicide : युवकाने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या

Suicide : युवकाने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

नवरगाव (चंद्रपूर) : कोकेवाडा पेंढरी येथील अंकुश भुजंगराव मगरे (१९) या युवकाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

घरामध्ये आई- वडील आणि दोन भाऊ असे कुटुंब राहातात. शुक्रवारी मोठा भाऊ व आई-वडील शेतात गेले. दरम्यान, अंकुश मगरे याने स्लॅबचे हुकाला नायलन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

 

 

Web Title: The youth committed suicide by hanging himself at home