कॅन्सरला कंटाळून तरुणाने घेतला गळफास;धक्काने आईनेही केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 20:45 IST2018-12-31T20:43:28+5:302018-12-31T20:45:27+5:30

तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आईनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गोठीवली येथे घडली. मायलेकांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Youth committed suicide due to cancer; | कॅन्सरला कंटाळून तरुणाने घेतला गळफास;धक्काने आईनेही केली आत्महत्या 

कॅन्सरला कंटाळून तरुणाने घेतला गळफास;धक्काने आईनेही केली आत्महत्या 

ठळक मुद्देसूरजला फुप्फुसाचा कॅन्सर होता. तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आईनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले.

नवी मुंबई - फुप्फुसाच्या कॅन्सरला कंटाळलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आईनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गोठीवली येथे घडली. मायलेकांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले.

रेखा सिंग (58) आणि त्यांचा मुलगा सूरज सिंग (35) हे गोठीवली येथील नेहा रेसिडन्सीमध्ये आपल्या कुटुंबासह राहात होते. सूरजला फुप्फुसाचा कॅन्सर होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्याने बेडरूममधील सिलिंगच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. हा धक्का त्याची आई रेखा सिंग यांना सहन झाला नाही. त्यानंतर त्यांनी त्याच बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून स्वत:चा जीव संपवला. रेखा यांची मुलगी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

Web Title: Youth committed suicide due to cancer;