तंत्र-मंत्राने करू लागली मोठ्या बहिणीवर उपचार, 18 तासानंतर झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 04:48 PM2021-09-05T16:48:12+5:302021-09-05T16:55:02+5:30

Rajasthan Chittorgarh News: घरातून मारहाणीचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली.

younger sister was treating elder sister with Tantra-Mantra, woman died 18 hours later | तंत्र-मंत्राने करू लागली मोठ्या बहिणीवर उपचार, 18 तासानंतर झाला मृत्यू

तंत्र-मंत्राने करू लागली मोठ्या बहिणीवर उपचार, 18 तासानंतर झाला मृत्यू

googlenewsNext

चित्तौडगड:मध्य प्रदेशातील चित्तौडगडमध्ये तंत्र-मंत्राने उपचार केल्यामुळे एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेवर 18 तास चेटूक सुरू होते, यादरम्यान शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला. पण, तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना चितौडगढमधील चर्च परिसरातील आहे. येथील गीताबाई नावाच्या महिलेला 5 मुली आहेत. 30 वर्षीय सुनीता माहेरी आली होती. माहेरी आल्यावर तिची अचानक तब्येत बिघडली. यानंतर तिच्या आईसह इतर बहिणींनी घरातच तिच्यावर उपचार सुरू केला. यावेळी चेटूक करण्याचे मंत्र 12वीत शितक असलेली सर्वात लहान मुलगी करत होती.

घरातून येत होता मारहाणीचा आवाज
गीताबाई यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, लहाल मुलीच्या अंगात गीताबाई यांच्या मृत पतीची आत्मा येते, असा कुटुंबियांचा समज आहे. सुनिता आजारी पडली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच उपचार सुरू केला. 18 तास तिच्यावर तंत्र-मंत्राने उपचार सुरू होते. यादरम्यान घरातून मारहाणीचा आवाजही येत होता. अखेर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दार उघडलं.

पोलिसांना दाखवली भीती
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हे कुटुंबिय त्यांनाही आत्माची भीती दाखवू लागले. कुटुंबियांनी बराचवेळ पोलिसांना सुनिताच्या जवळ जाऊ दिलं नाही. पण, अखेर पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढलं आणि सुनिताला हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: younger sister was treating elder sister with Tantra-Mantra, woman died 18 hours later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.