प्रेमसंबंधास होता विरोध!, धाकट्या भावाची चाकूने गळा चिरून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:48 IST2021-07-01T17:46:37+5:302021-07-01T17:48:36+5:30

Murder Case : ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली.  

The younger brother was stabbed to death in a love affair | प्रेमसंबंधास होता विरोध!, धाकट्या भावाची चाकूने गळा चिरून केली हत्या

प्रेमसंबंधास होता विरोध!, धाकट्या भावाची चाकूने गळा चिरून केली हत्या

ठळक मुद्देमृतक गीतेश मानकर हा त्याचा आई वडीलासह दहेगाव येथे राहतो. त्याचा मधला भाऊ आरोपी सतीश मानकर हा वलनी आणि मोठा भाऊ जगदीश रामदास मानकर वय 36 वर्ष हा खंडाळा ता पारशिवनी येथे राहतो.

खापरखेडा : पोलीस स्टेशनअंतर्गत दहेगाव रंगारी येथील काकडे लेआऊट येथे गीतेश रामदास मानकर वय 29 वर्ष यांची राहत्या घरी त्याचा मोठा भाऊ सतीश रामदास मानकर वय 33 राहणार वलनी वेकोली कॉलनी याने चाकूने गळा कापून हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली.  

मृतक गीतेश मानकर हा त्याचा आई वडीलासह दहेगाव येथे राहतो. त्याचा मधला भाऊ आरोपी सतीश मानकर हा वलनी आणि मोठा भाऊ जगदीश रामदास मानकर वय 36 वर्ष हा खंडाळा ता पारशिवनी येथे राहतो. मृतक गीतेशचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यांच्या लग्नाला सतीशचा विरोध होता. यावरून दोघांचा वाद झाला. वाद अति वाढल्याने सतीशने गीतेशचा चाकूने गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर गीतेश घरीच झोपला. गीतेश च्या मोठ्या भावाला घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखा, खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहचले.

Web Title: The younger brother was stabbed to death in a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.