Young youth commits suicide after tortured by owner | मालकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 
मालकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

राजगुरुनगर : मालकाने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याने कंटाळून ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायगाव (ता.खेड) येथे सोमवारी (दि. १८) ही घडली. रामदास सहादु खंडवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.  
वडगाव पाटोळे (ता.खेड) येथे नवनाथ अशोक पाटोळे यांच्या मालकीचे फॅब्रिकेशनचे दुकान आहे. दुकानात गेल्या दोन वर्षापासून वेल्डर म्हणून रामदास सहादू खंडवे (वय ३२ रा. सायगांव,तळ्याची ठाकरवाडी ता.खेड)  काम करत होता. रामदास एखाद्या दिवशी कामाला गेला नाही तर नवनाथ हा सायगाव येथे जाऊन कामाला चल म्हणून मारहाण,शिवीगाळ, दमदाटी करित होता. रामदास हा दि १५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी वडगाव पाटोळे येथे कामाला गेला होता. मात्र तो पुन्हा ११ वाजता सायगाव येथे आला होता. त्याच्या पाठोपाठ नवनाथही सायगाव येथे घरी आला. तु फक्त माझ्याकडे कामाला यायचे, आला नाही तर तुला रात्री येऊन मारहाण करीन तसेच तुझी दोन मुले घेऊन जाईन अशी धमकी दिली होती. त्रासाला कंटाळून रामदास याने सोमवारी रात्री घराच्या पाठीमागील पडवीत लाकडी वाशाल्या नॉयलॉनची दोरी घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच घराच्या खिडकीच्या काचेवर मी मालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित आहे असे काळ्या कोळश्याने लिहून ठेवले होते. नवनाथ पाटोळे याच्या विरूध्द खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयत रामदास याचा भाऊ पप्पू सहादू खंडवे (वय २२) रा. सांयगाव यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख करित आहेत.
 

Web Title: Young youth commits suicide after tortured by owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.