मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 19:34 IST2019-09-19T19:34:02+5:302019-09-19T19:34:39+5:30

तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले.

The young women's molestation by a friend | मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग

मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग

पिंपरी : तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तरुणी कॉलेजला गेली असता तिचा पाठलाग करून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. १८) निगडी येथे घडली. 
  याप्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धीरज रमेश भोसले (रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धीरज व फियार्दी एकमेकांच्या ओळखीचे असून मित्र-मौत्रिणी आहेत. फियार्दीचे वडील त्यांच्या मूळगावी गेले असता आरोपी फियार्दीच्या घरी गेला. तिथे आरोपीने ह्यमाझे तुज्यावर प्रेम आहेह्ण असे म्हणत अश्लील कृत्य केले. तसेच दुसºयादिवशी फियार्दी कॉलेजला गेली असता, तिचा पाठलाग केला. तिला अडवून ह्यशेवटचे सांग तू माज्यासोबत बोलणार आहेस की नाहीह्ण असे बोलत फियार्दीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा नोंदवला असून, निगडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: The young women's molestation by a friend